🌟यशश्वीतेसाठी कौशल्ये आत्मसात करा - मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे


🌟अनुराधा अभियांत्रिकीमधे 15 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन🌟

चिखली : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ लेखी गुणांकडे लक्ष न देता प्रात्यक्षिक व कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्या असे आवाहन, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.राहुल भाऊ बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना केले.

अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली येथील ईलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगधंद्यातील अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी इंडो जर्मन टुलरूम , औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 15 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते व  प्रमुख ट्रेनर प्रविण जावळे, प्राचार्य डॉ.अरूण नन्हई सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. राजेश मापारी यांनी केले.

या कार्यशाळेचा अभ्यासक्रम दि. 10 ते 25 फेब्रुवारी म्हणजे 15 दिवसीय आहे. तसेच काही औद्योगिक भेटी ही या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याप्रसंगी प्राचार्य डाॅ.अरुण नन्हई  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिक्षण पुर्ण होत असतानांच आपण आपल्या क्षेत्रातील भविष्याचा मागोवा घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने ही कार्यशाळा  महाविद्यालयाने आयोजित केली आहे, तरी या कार्यशाळेसाठी असलेल्या सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी याचा पुर्ण उपयोग करून घ्यावा आणि आपली प्रगती साधावी असे ही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा वेग सध्याच चक्रावून टाकणारा झाला आहे. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. यंत्रमानव व मानव ह्यामधील दरी आगामी शतकात कमी कमी होणार आहे.‘आॅटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे होत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, बिग डेटा अ‍ॅनालिसिस, रोबोटिक्स या आणि यांसारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक  आॅटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत, यात शंकाच नाही. सदर कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानासह  आत्मविश्वासा ही वाढणार आहे.

सदर कार्यशाळेच्या यशश्वीतेसाठी प्रा. बि. एस. लंकेश्वर, प्रा. अमोल भटकर , प्रा. आकाश मगर यांसह त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली.....                               

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या