🌟पुर्णा तालुक्यातील गौर गावातील श्री सोमेश्वर मंदिर देवस्थानात अखंड हरीनाम सप्ताह....!


🌟श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे देखील आयोजन🌟


 
(महाशिवरात्री निमित्त शिवपुराण कथेत विविध देखावे जठाधारी महादेव पात्र मुंजाजी जोगदंड व संतोष जोगदंड

पुर्णा (दि.२६ फेब्रुवारी २०२५)  जीवनात प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी धडपड सुरू ठेवावी लागते त्यात फक्त मनुष्य प्राण्याला अन्न धन संचय करण्याचा मोह आवरत नाही.ते करतांना आई - वडील जन्मदाते यांच्यावर अन्याय होणार नाही याचा विचार केला तर कोणत्याच सजीवाला त्रास न देणारी पिढी निर्माण होईल यातून शिवपुराण कथेचे सार्थक झाले असे समजावे असे मार्गदर्शन शिवपुराण कथाकार ज्योती धनाडे यांनी केले.

      गौर येथील जागृत श्री सोमेश्वर देवस्थान महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा (ता. 21) पासून सुरू आहे अनुक्रमे कीर्तन कैलास महाराज पंडित संभाजीनगर ,भगवान महाराज महालिंगीकर ,सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर, अनिल महाराज आटपाडी सांगलीकर, बालाजी महाराज जाधव आदी कीर्तन झाली.अतुल महाराज आदमाने ,शिवाजी महाराज देशमुख रामप्रसाद महाराज यांची कीर्तने होणार आहेत

         ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह .भ. प. दगडू महाराज गौरकर प्राध्यापक  पुंडलिक जोगदंड हे करत आहेत. महाशिवरात्र निमित्त पहाटे चार पासून रुद्राभिषेक 21 ब्राह्मण देवताकडून करण्यात आला गावातील प्रत्येक घरचा एक नागरिक पूर्ण दिवसभर अभिषेक करतात. शिवपुराण कथेत विविध देखावे सादर करण्यात आली देवदैत्य यांच्याकडून मानावाला अध्यात्मिक मानसिक सुख मिळवण्यासाठी किती गरजेचे आहे याचे मार्गदर्शन शिवपुराण कथाकार संघर्ष कन्या ज्योतीताई धनाडे यांनी केले . महाशिवरात्रीनिमित्त श्री सोमेश्वर जागृत देवस्थान यांची ,(ता. 27) गुरुवार रोजी रात्री दहा वाजता पालखी सोहळा होणार आहे त्यानिमित्य छत्रपती संगीत संच सिंदगी ता. कळमनुरी जि.हिंगोली विरुद्ध शिवशक्ती संगीत संच मरळक ता.जि .नांदेड यांच्यात संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त होत असलेल्या सप्ताह मध्ये दररोज सायंकाळी महाप्रसाद होत आहे. महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी गौर यांच्याकडून केले जाते.                                                     

💫गौर गावात महाशिवरात्री निमित्त मागील २५ वर्षांपासून सप्ताहाचे आयोजन - सोपानराव जोगदंड 

मागील २५ वर्षापासून महाशिवरात्री निमित्त सप्ताह होत आहे मात्र या वर्षी ज्योती धनाडे ही महीला प्रथमच शिवपुराण कथा सांगत आहेत म्हणून गौर पंचक्रोशीतील सात हजार महीला व तीन हजार पुरुष कथेस उपस्थीत राहतात त्या सर्वाना महाप्रसादवेळी महीला पंगतीत वाढून पत्रावळी उचलन्याचे काम करत आहेत गावात यात्रेचे स्वरूप आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या