🌟यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसह इतर व्यवसायांचे एकूण ४० स्टॉल लावले होते🌟
पालम :- पालम तालुक्यातील फरकंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे काल गुरूवार दि,१३ फेब्रुवारी २०२५ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून शाळा प्रशासनाच्या वतीने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसह इतर व्यवसायांचे एकूण ४० स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे हा मानस मनाशी बाळगून शाळा प्रशासनाने हा उपक्रम राबविला व आनंद नगरीचे आयोजन केले होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ पौळ गावातील आजा/माजी सरपंच,उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद नगरीचा हा कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला यावेळी सर्व शिक्षक पत्की सर,कांबळे सर,गोपाले सर, पौळसर,संदीप कांबळे, करामुंगे मॅडम, वट्टमवार सर, वरील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या