🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीत ८० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त....!


🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६९९ उमेदवार रिंगणात : त्यापैकी ५५५ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त🌟

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत जवळपास ८० टक्के उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त झाल्या आहेत तर आम आदमी पार्टी,भारतीय जनता पक्ष व जनता दल (संयुक्त) व लोकजनशक्ती (राम विलास) यांच्या सर्व उमेदवारांनी आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळवले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६९९ उमेदवार रिंगणात होते त्यापैकी ५५५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसच्या ६४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. केवळ अभिषेक दत्ता, रोहित चौधरी व देवेंद्र यादव या काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम वाचली. 'एमआयएम'च्या शिफा उर रेहमान खान या दोन जागावर निवडणूक लढवत होत्या. त्यांनी आपली अनामत रक्कम वाचवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या