🌟पुर्णेतील संविधान गौरव समितीच्या वतीने डॉ.दत्तात्रय वाघमारे यांचा संविधान ग्रंथ देवून सत्कार.....!


🌟संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार संपन्न🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरातील विद्या प्रसारिणी सभेची शाळा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दत्तात्रय वाघमारे यांच्या सेवा पूर्ती निमित्त या शाळेच्या संस्थापक मंडळाने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी पुर्णेतील संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक मा.प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.दत्तात्रय वाघमारे,सौ.डॉ.शांताबाई वाघमारे,डॉ.विनय वाघमारे यांना शाल,पुष्पहार,संविधान ग्रंथ आणि संविधान प्रतिमेची प्रत देवून सन्मानित करण्यात आले. या सत्करात प्रा.अशोक कांबळे,गौतम काळे,विजयकुमार जोंधळे,सुभाषचंद्र ओझा,सय्यद कलीम आदिंचा समावेश होता. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.विनय वाघमारे यांनी भूषविले.तर मंचकावर नेहरू इंग्रजी शाळेचे संचालक उद्योगपती श्रीनिवास काब्रा,भीमराव कदम,उत्तमराव कदम,साहेबराव कदम,नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज,उमेश महाराज टाकळीकर,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तर या प्रसंगी माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे व उप शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांचे सत्कारमूर्ती डॉ.दत्तात्रय वाघमारे यांच्या जीवन कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सन्मान पत्राचे वाचन डॉ. हरीभाऊ पाटील यांनी केले. या प्रसंगी डॉ.दत्तात्रय वाघमारे यांची ग्रंथतुला करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक मा.देविदास उमाटे यांनी शिक्षक वृंधा च्या वतीने डॉ.वाघमारे यांना सोन्याची अंगठी देवून सन्मानित करण्यात आले तर जवाहर लाल नेहरू इंग्रजी शाळेचे वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया मॅडम,आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेची प्रतिकृती देवून डॉक्टर वाघमारे साहेबांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन या शाळेचे सहशिक्षक स्वामी यांनी केले.

     या कार्यक्रमाला डॉ.अजय ठाकूर,प्रतिष्ठित व्यापारी नफीस थारा,डॉ. प्रफुल्ल सोनी,प्रकाश रवांदले,आनंद अजमेरा,निलेश धामण गावे,विजय कदम,डॉ.गुलाब इंगोले,शरद कुऱ्हे,दिलीप माने,जगदीश जोगदंड,सतीश टाकळकर,अमृत कदम,हरीभाऊ कदम,आदीसह शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक,विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या