🌟आधारकार्ड,पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र,वाहन परवाना,जन्म दाखला,शिधापत्रिका,पासपोर्टही बनवले बोगस🌟
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीतल्या जुहूगावात राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,वाहन परवाना,जन्म दाखला,शिधापत्रिका,पासपोर्ट व मुलाचे जन्म प्रमाणपत्र बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याने व त्यांच्या मुलाने ते राहत असलेले जुहूगाव येथील घर खासगी संस्थेमार्फत कर्ज काढून स्वतःच्या नावाने करून घेतल्याचे तपासात आढळून आले आहे.
याप्रसंगी या तिघांना पुन्हा अटक केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंक कक्षाने गत २४ नोव्हेंबर रोजी वाशीतील जुहूगावात छापा मारुन शरो अबताब शेख (४८) त्याची पत्नी सलमा शरो शेख (३९) व त्यांचा मुलगा अब्दुल रहिम शरो शेख (२२) या तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते......
0 टिप्पण्या