🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा चौरस्तावरील लोखंडी पादचारी पुल तात्काळ हटवण्यात यावा.....!


🌟सरदार अमरजीसिंघ कुंजीवाले व गुरदीपसिंघ संधू यांची मागणी🌟


नांदेड :- नांदेड शहरातील सचखंड गुरुद्वारा चौकामध्ये महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने सन २००८ यावर्षी लोखंडी पादचारी पुल उभा  करण्यात आला होता. मात्र त्याच्या वापर होत नसल्याने या पुलामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सदर फुल हटवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्याचे सदस्य स.अमरजीतसिंघ कुंजीवाले व मराठवाडा विभाग प्रमुख अल्पसंख्याक मोर्चा भाजपा महाराष्ट्र सदस्य गुरुदीप सिंघ संधू यांनी केली आहे.

 गुरुता गद्दी सोहळा २००८ करिता यात्रेकरूच्या सोयीसाठी प्राचार्य लोखंडी पूल उभारण्यात आला होता या पुलाच्या अपेक्षित वापर होत नसल्याने सदर पुलाच्या वर्षभर कोणीही वापर करत नसल्याने हा पुल नाहक भुर्दंड झाल्याचे लक्षात येत आहे. परंतु शीख धर्माकडून  होला मोहल्ला,वैशाखी, दशहरा दिवाली, कार्यक्रमादरम्यान या पुलावर भाविकांची मोठी गर्दी कार्यक्रम पाहण्यासाठी होत असते यादरम्यान एखादी दुर्घटना घडवून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुजरात येथील मोरोंबी पूल कोसळून ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मोठी दुर्घटना घडून १४० जणांच्या जीवितहानी झाली होती. येणाऱ्या १४ मार्च रोजी प्रसिद्ध होला मोहलांचा कार्यक्रम आहे. यामध्ये कोणतेही दुर्घटना घडू नये. त्यामुळे सदर पुलाची कोणतीही आवश्यकता नसल्याने सदर लोखंडी पादचारी पुल पूर्णपणे हटवून माग मोकळा करावा अशी मागणी कुंजीवाले व संधू यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भेटून निवेदन दिले. त्यांच्यासोबत ॲड.सुरेंद्र सिंघ लोणी वाले हरप्रीत सिंघ मेजर भाजपाचे गुरुप्रीतसिंघ सोखी व हरप्रीतसिंघ पुजारी यांच्या पण स्वाक्षऱ्या आहे. या निवेदन ची प्रत माननीय मुख्यमंत्री साहेब. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब नांदेड व मनपा आयुक्त साहेब यांना देण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या