🌟राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश : वसमतचा अभियंता योगेश पांचाळ अखेर सुखरूप मायदेशी....!

 


🌟खा.डॉ.अजित गोपछडे यांनी परराष्ट्रमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे केला होता सुटकेसाठी पाठपुरावा🌟


नांदेड/हिंगोली :- भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील उद्योजक अभियंता योगेश पांचाळ हे इराणमध्ये बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्या अभियंता पांचाळ यांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी सुखरूप आणण्यात आले आहे. यासाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी देशाचे परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता यावरच न थांबता इराणच्या दूतावासाकडेही खा. गोपछडे यांनी संपर्क साधला होता.खा.डॉ. गोपछडे यांच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्याचा भूमिपुत्र बेपत्ता झालेला अभियंता योगेश पांचाळ हा सुखरूप घरी पोहोचला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील उद्योजक अभियंता योगेश पांचाळ हे दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी इराणमध्ये गेले होते. इराणमध्ये काही नवे उद्योग भारतात आणण्याच्या अनुषंगाने ते अभ्यास करीत असतांना इराण पोलिसांनी पांचाळ यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुरूंगात ठेवण्यात आले. वसमत येथील तरुण अभियंता इराणमध्ये बेपत्ता झाल्याचे समजताच खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा आणि परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह व देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले. सदरील बेपत्ता अभियंत्याचा शोध घेऊन त्याला मायदेशी परत आणावे अशी विनंती केली. याचवेळी इराणच्या दूतावासाशी संपर्क साधला.अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा, कीर्तीवर्धन सिंह यांच्या प्रयत्नांतून बेपत्ता झालेला वसमतचा उद्योजक अभियंता योगेश पांचाळ यांना भारतात सुखरूप आणण्यात आले आहे. आज त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. खा.डॉ. अजित गोपछडे यांनी अभियंता योगेश पांचाळ याच्या शोधासाठी आणि त्याला सुखरूपपणे भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी प्रयत्न केल्याने पांचाळ कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, तर खा. डॉ. अजित गोपछडे यांचे आभार मानले आहेत. इराणमधून बेपत्ता अभियंत्याला सुखरूप भारतात आणल्याबद्दल खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारत सरकारचे आभार मानले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या