🌟भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचा निर्णय : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर...!


🌟भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जवळपास ७ कोटी खातेधारकांना होणार🌟

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) २०२४-२५ या वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय 'ईपीएफओ'ने घेतला आहे.

भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जवळपास ७ कोटी खातेधारकांना होणार आहे फेब्रुवारी २०२४ मध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटनेने २०२३-२४ साठी 'ईपीएफ'चा व्याजदर किंचित वाढवून ८.२५ टक्के केला होता. तर २०२२ मध्ये 'ईपीएफओ'ने व्याजदर घटवून ८.१ टक्के केला होता. यावेळीही व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या