🌟माता रमाईचा आदर्श महिलांना घेतला पाहिजे - ॲड चित्रलेखा कांबळे


🌟पुर्णा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना त्या म्हणाल्या🌟


पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी २०२५) :- माता रमाई संस्कारी होत्या ' वेगवेगळे दुःख सहन करून कष्ट करून मुलांचा सांभाळ केला बाबा साहेबांना आंदोलनामध्ये खंबीरपणे उभ्या राहिल्या ' पतीला समाज सेवेत रमल्या अशा रमाईचा महिलांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन ॲड चित्रलेखा कांबळे नांदेड यांनी केले.


पुर्णा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रमाई आंबेडकराची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत पी धम्मानंद भन्ते पंयावंश प्रमुख वक्त्या मांदेड येथील केंद्रीय शिक्षिका ॲड चित्रलेखा कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव महाराष्ट्र राज्य परभणीचे डीआय खेडकर समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख आनंदा भेरजे आदि उपस्थित होते . पहिल्या सत्रा मध्ये सकाळी डॉ आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेबाच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे यांच्याहस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले समता सैनिक दलांनी सलामी दिली दुपारच्या सत्रामध्ये डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन डॉ आंबेडकर नगर येथे रमाई महिला मंडळाच्या हस्ते पंचशिल धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले भबुद्ध व डॉ बाबासाहेबाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या पुष्पहार अर्पण करून रमाई आंबेडकरां का तैलचित्रास अभिवादन करण्यात आले ध्वजगीत घेण्यात आले रमाईच्या तैलचित्राची चांदीच्या स्थातून वा द्यवृंद लेझीम पथका सह पूर्णा शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली त्या नंतर डॉ आंबेडकर चौक येथे धम्मसभेत रुपांतर करण्यात आले यावेळी रमाई आंबेडकर व डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भन्ते पी धम्मानंद यांनी त्रिशरण पंचशिल दिले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲड चित्रलेख कांबळे म्हणाल्या की रमाईचा स्वभाव शांत संयमी स्वाभिमानी होत्या आपली चार मुल औषधाविना मेली समाजातील मुलांसाठी स्वतःची दागिने विकून विद्यार्थ्याचा जेवणाची सोय केली पतीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही वेगवेगळ्या आंदोलनात बाबासाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या टाकल्या रमाई मुळे आज समाजातील महिला चांगल्या प्रकारचे जिवन जगत आहेत आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे असे आवाहन केले या नंतर राज्य सचिव बाबा साहेब धबाले म्हणाले की रमाई आंबेडकरांना बाबा साहेब घर खर्च करण्यासाठी महिन्याला ५०रु देत रमाई दिलेल्या ४५रु मध्ये घर खर्च करून उरलेले पैसे बाबासाहेबांन शिक्षणासाठी द्यायच्या रमाईच्या अर्थिक गणित महिलांनी समजून घेतल पाहिजे रमाईनी बाबासाहेबां साथ दिली आपण ही पतीला साथ दिली पाहिजे भारतीय बौद्ध महासभा ही बौद्धांची मातृसंस्था आहे यासंस्थे पाठीमागे खंबीरपणे उभे राहून चळवळीला बळ द्या तरूणांनी समता सैनिक दलात सहभागी झाले पाहिजे गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा झाली पाहिजे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी भन्ते पी धम्मानंद डीआय खेडकर भन्ते पंयावंश यांनी विचार मांडले . रमाई जयंतीच्या मिरवणूक पंचशिल नाट्यग्रुप च्या मुलींनी उत्स्फुर्तपणे लेझीम तालावर बेधुंद होऊन नाचल्या बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी सकाळच्या सत्रात शाहीर प्रकाश जोंधळे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी सुत्रसंचालन बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे यांनी तर आभार बौद्धाचार्य रत्नदिप एंगडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल कचरे शामराव जोगदंड गौतम दिपके केशव मकासरे बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे यशवंत लांब सोंगे प्रा बंडू गायकवाड राहूल भगत प्रा गौतम गायकवाड सुनिल खाडे किशोर ढाकरगे समता सैनिक दलाचे पदाधिकारी भारतीय बोद्ध महासभेच्या पदाधिकारी व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यां नी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या