🌟नांदेड येथे २६ फेब्रुवारी रोजी 'मी कसा घडलो' 'जगणं दुनियादारीचं' गौरव पुरस्कार सोहळ्यासह 'रिल विनर ॲप शुभारंभ'....!

 


🏆पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून डॉ.बबन जोगदंड यशदा पुणे यांची उपस्थिती🏆

नांदेड (दि.२२ फेब्रुवारी २०२५) :- नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील देवकृपा फंक्शन हॉल येथे बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता 'मी कसा घडलो' संयोजन समितीच्या वतीने 'जगणं दुनियादारीचं' गौरव पुरस्कार सोहळ्यासह 'रिल विनर ॲप' शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


कसा घडलो' संयोजन समिती आयोजित 'जगणं दुनियादारीचं' गौरव पुरस्काराचे वितरण व 'रिल विनर ॲप, शुभारंभ' सोहळा डॉ.बबन जोगदंड यशदा पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सदरील पुरस्कार मा.देविदास फुलारी (साहित्यिक, नांदेड),डॉ.अनंत राऊत (साहित्यिक,नांदेड),डॉ.छाया कुलाल (उपायुक्त,जात पडताळणी,नांदेड),मा.शिवानंद मिनगीरे (सहा.आयुक्त, समाज कल्याण,नांदेड),मा.रामचंद्र वंगाटे (संशोधन अधिकारी,जात पडताळणी,नांदेड),मा.बबिता गोदने (सामाजिक क्षेत्र,मुंबई),मा.सुखदेव चिखलीकर (संस्थापक अध्यक्ष,बहुजन संघर्ष सेना),मा.मारोती कल्याणकर (मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले शाळा नांदेड),मा.सबुरी डोंगळीकर (इंजिनिअर,नांदेड),मा.बाबुराव कसबे (उद्योजक, नांदेड),मा.निर्मलकुमार सुर्यवंशी (साहित्यिक, नांदेड),मा.अरुणा जाधव (प्रदेश सदस्या,जिजाऊ ब्रिगेड, नांदेड),मा.विक्की वाघमारे (सामाजिक क्षेत्र, नांदेड),मा.भूषण सोनुले (उद्योजक,नांदेड),इंजि,नसिम जावेद पठाण (सामाजिक क्षेत्र, नांदेड),डॉ.राम वाघमारे (साहित्यिक,नांदेड),प्रा.दिगंबर गायकवाड (शैक्षणिक क्षेत्र, लातूर),मा.करुणा थोरात (सामाजिक क्षेत्र, औरंगाबाद),मा. शिवा कांबळे (साहित्यिक,नांदेड),मा.उत्तम गवाले (सामाजिक क्षेत्र,नांदेड),मा.वनमाला राठोड (सामाजिक क्षेत्र, नांदेड) आदीं मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार असून सदरील कार्यक्रमाचे आयोजक 'मी कसा घडलो' संयोजन समितीचे सन्माननीय पदाधिकारी सोनू दरेगावकर (युवा साहित्यिक, नांदेड),राहुल वाघमारे,अविनाश पाईकराव,दत्तप्रसाद तालीमकर,विनोद पाचंगे,रमेश तालीमकर,दिपक पावडे,सय्यद एजाज, नितीन एंगडे,शुभम शेळके, संभाजी तोटरे, प्रशिक गायकवाड, अजित घायाळे, विकास जाधव हे आहेत सदरील कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते व प्रेक्षकांनी  वेळेचे बंधन पाळण्यात येणार असल्याने वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या