🌟सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित🌟
परभणी - तालुक्यातील मटकऱ्हाळा आनंदवाडी या रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट करून सोडून दिले होते. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने तेथून ये जा करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. रस्त्यावर फक्त गीट्टी अंतरलेली असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अनेक छोटे-मोठे अपघात या अर्धवट रस्त्यामुळे झाली झाले.
अर्धवट काम करून दिलेला रस्ता कंत्राटदाराने तात्काळ पूर्ण करून द्यावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ०९ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या निवेदनात तात्काळ काम न सुरू झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला होता.
आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पाटील यांच्या दालनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मटकऱ्हाळा येथील ग्रामस्थ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कंत्राटदाराने आनंदवाडी ते मटकऱ्हाळा या अर्धवट रस्त्याच्या कामाची सुरुवात केली असून तेथे रस्ता बांधणीचे साहित्य टाकण्याचे काम मागील आठ दिवसापासून सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी मुरूम अंथरून डांबरीकरणाचे काम १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदाराने बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले असून यानंतर कंत्राटदाराने काम थांबवल्यास परत आंदोलन केलं जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी या बैठकीत दिला.
बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पाटील, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, खूप अभियंता, कनिष्ठ अभियंता, वैभव संघई, प्रल्हाद गरुड, सुरेश गरुड, हेमराज गरुड, शेख बशीर इत्यादी उपस्थित होते.......
0 टिप्पण्या