🌟हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन काँग्रेसने आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची दिली संधी🌟
✍️ मोहन चौकेकर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचे उत्तर मिळाले आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानतंर आता काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. या पदाच्या शर्यतीत माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख आणि युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, या तीन बड्या नावांना डावलून काँग्रेसने सरप्राईजींग व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबादारी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन काँग्रेसने आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
💫कोण आहेत हगर्षवर्धन सपकाळ ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिले आहेत. गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
उत्तराखंड आणि पंजाब गुजरातसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासीसाठी त्यांनी जिवनोत्थान कार्यक्रम राबवला. त्यानंतर ते आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
💫हर्षवर्धन सपकाळ यांचा अल्प परिचय :-
हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म 10 जानेवारी 1968 साली झाला.
हर्षवर्धन सपकाळ प्रचंड अभ्यासू आणि उच्चशिक्षित आहेत.
बुलढाणा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत.
अध्यक्ष असताना राबवलेलं शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली.
14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले.
2014 साली पहिल्यांदाच बुलढाण्यातून काँग्रेसचे आमदार झाले.
2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं, पण पराभव स्विकारावा लागला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठे काम केले आहे.
राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं.
आमदार असताना कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लिन इमेज होती
ग्रामीण भागात काम, हार्डकोअर कार्यकर्ता, पक्षाशी निष्ठावंत आहेत.
भाजपच्या ऑफरही होत्या, पण काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम राहिले.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या