🌟वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच या ध्येयाने व जिद्दीने त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केले🌟
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकऱ्यांच्या मुलांने एमपीएससी मधून महसूल सहाय्यक पदाला गवसनी घातली आहे.
कानबाराव हराळ हा ग्रामीण विद्यार्थी आहे त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा हिवरखेडा व माध्यमिक शिक्षण होळकर विद्यालय खडकी येथे झाले आहे व पुढील शिक्षण हिंगोली व नांदेड येथे झाले आहे कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता हे यश संपादन केले आहे या यादी देखील दोन-तीन वेळेस एमपीएससी परीक्षा कानबाराव यांनी दिली होती मात्र त्यामध्ये त्याला अपयश मिळाले जिद्द कायम ठेवत पुन्हा जोमाने परीक्षेला सुरुवात केली आज महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे हिवरखेडा गावाचे कानबाराव सुदामराव हराळ सर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत एमपीएससी मधून घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झाल्या बद्दल दि 13 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी हिवरखेडा येथील मुख्य मार्गवरून भव्य मिरवणूक काढून गावातील ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे कानबाराव हराळ यांचे वडील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे मुलीचे लग्न मुलाचे शिक्षण करण हा मोठा संघर्ष त्यांच्यासमोर उभा होता त्यांच्याकडे फक्त दोन एकर शेती होती मुलाच्या शिक्षणासाठी ही शेती पण त्यांनी विकली मुलाने देखील त्याचे चीज केले त्याच्या या यशा बद्दल त्याचे गावभर कौतुक केले जात आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ध्येयाने व जिद्दीने त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करताना प्रत्येक पायरीवर अभ्यासाच्या जोरावर यशस्वी होत गेला . खरंतर शासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असताना, अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र, जिद्द व आत्मविश्वाच्या बळावर कुठलेही यश अवघड नाही हे त्याने दाखवून दिले. 2021 साली हराळ यांचे लग्न झाले लग्नानंतर देखील या परीक्षेसाठी त्याना बायकोचा खूप पाठिंबा मिळाला. विशेषत: आई आणि वडील यांनी पूर्णपणे पाठबळ दिले. म्हणूनच, तिला हे यश संपादन झाले आहे......
✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
0 टिप्पण्या