🌟नांदेड तख्त सचखंड श्री हजूर साहिबचे सरकारी प्रशासक डॉ विजय सतबीर सिंग भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत....!


🌟भारतीय मजूर संघाचे सदस्य दिपकसिंघ गलीवाले यांचा आरोप🌟 


श्री हजुर साहेब नांदेड :- नांदेड येथील भारतीय मजूर संघाचे सदस्य तथा स्थानिक नागरिक स.दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात स्थानिक गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाची सद्यस्थिती आणि सर्व आर्थिक,शैक्षणिक,आर्थिक,भ्रष्टाचार इत्यादींची दखल घेण्याची आणि  योग्य प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 स.दिपक सिंघ गल्लीवाले म्हणाले की गेल्या 25 वर्षांपासून नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब मंडळात महाराष्ट्र सरकार द्वारे लोकशाही पद्धतीने स्थापन केलेल्या गुरुद्वारा मंडळाला बरखास्त करून कधी प्रशासक नियुक्त करून आणि कधी प्रशासकीय समिती स्थापन करून अल्पसंख्याक शीख समुदायावर अन्याय केला जात आहे यापूर्वी नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब कायदा, 1956 च्या कलम 11 मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र सरकारने मंडळातून अध्यक्ष नियुक्त करण्याचे मंडळाचे अधिकार काढून घेतले होते, ज्याला स्थानिक शीख समुदायाच्या लोकांनी तीव्र विरोध केला होता.

ऑगस्ट 2023 पासून मंडळाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी पदभार स्वीकारला, परंतु ते या जबाबदारीबद्दल उदासीन राहिले. ते स्थानिक नाहीत, त्यांच्या दौरे ही कमी असतात आणि गुरुद्वारा सचखंड मंडळाचे कार्यालय सुरळीत चालवण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुरुद्वारा मंडळाचे उत्पन्न कमी झाले आहे आणि ते वाढवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्याच वेळी, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना सेवा नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीचे निकष काय असावेत याबाबत कोणतेही धोरण नाही. फसवणुकीचे, घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाल्यानंतरही आर्थिक नुकसान भरून काढले जात नाही. सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलने होऊनही कोणतीही न्याय्य कारवाई केली जात नाही. सध्या देखील मोठ्या घोटाळ्यांमध्ये निलंबित झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मंडळाच्या कार्यालयाची सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी प्रशासक डॉ. पी. एस. पसरीचा यांच्या कार्यकाळात मंडळाच्या कार्यालयात कडक शिस्त होती, परंतु सध्याचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या कार्यकाळात अनुशासनहीनता सातत्याने वाढत आहे. प्रामाणिक आणि गरीब कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. त्यांच्या पैकी कनिष्ठ कर्मचार्यांना पदोन्नती देऊन त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. सर्वात मोठे प्रकरण म्हणजे गुरुद्वारा मंडळाच्या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत,  इतर ठिकाणीही अतिक्रमण झाले आहे परंतु उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, गुरुद्वारा मंडळाच्या भाडेकरूंशी भाडे करार केले गेले नाहीत किंवा त्यांचे नूतनीकरण केले गेले नाही. भाडेकरूंवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी  आहे, परंतु ते वसुलीसाठी प्रयत्न केले जात नाही.

आधीच्या मंडळांच्या काळात शीख समाजायाच्या विकासासाठी सुरू झालेल्या शैक्षणिक संस्था भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहेत. दुसरीकडे, शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले मोफत कोचिंग क्लासेस, मोफत संगणक क्लासेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी त्यांचे पुनरुज्जीवन आणि विकासासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. ते असे प्रशासक  ठरले आहेत जे मंडळाच्या अनेक वर्षांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून समाजाचे नुकसान करत आहेत. 

अनावश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे, ज्यामुळे मंडळावर आर्थिक भार वाढत आहे. कोणत्या निकषांवर नोकऱ्या दिल्या जातील किंवा केव्हा आणि कशी पदोन्नती दिली जाईल हे ठरवण्यासाठी कोणतेही मनुष्यबळ विकास धोरण तयार करण्यात आलेले नाही. याशिवाय अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मुद्यांवर, कधी निवेदनांद्वारे तर कधी सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर चर्चेच्या मालिकेद्वारे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांना गुरुद्वारा मंडळाच्या कामकाजात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले गेले , तरीही त्यांनी कोणतीही न्यायोचित कारवाई केली नाही......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या