🌟निलंबित पोलिस कर्मचारी अशोक हंबर्डे यांचा मोबाईल देखील शुक्रवार पासून बंद : कुटुंबीय चिंतेत🌟
बिड :- बिड जिल्ह्यातल्या गेवराई पोलिस स्थानकात कार्यरत असतांना आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ न राहता अवैध वाळू तस्करांशी हितसंबंध जोपासत वाळू तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवून बिड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी निलंबित केलेला पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हा मागील दोन दिवसापासून गायब असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निलंबित पोलिस कर्मचारी अशोक हंबर्डे यांचा मोबाईल देखील शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ रोजीच्या ०४.०० वाजेपासून बंद असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
बीड जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याच्या विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे अवैध चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना त्यांनी नुकतीच समज दिली.बिड जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा,मटका/जुगार,परळी येथील थर्मलची राख यामुळे गुंडगिरी वाढीस लागली आहे. त्यातून अपहरण हत्या,हत्येचा प्रयत्न,खंडणी असे गंभीर गुन्ह्यांचे प्रकार घडतं आहेत या सगळ्या गंभीर घटनांची दखल घेत बिड जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहणावर कारवाई करण्याचे आदेश डावलून कर्तव्यात कुचराई करणाऱ्या गेवराई ठाण्यातील दोघांवर कावत यांनी शुक्रवारी निलंबणाची कारवाई केली. यात पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे यांचा समावेश आहे......
0 टिप्पण्या