🌟दैनिक आधुनिक केसरी वृत्तपत्राचे संपादक डॉ.प्रभू गोरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार जाहीर....!


🌟पुणे येथील विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या २७ व्या साहित्य संमेलनात होणार डॉ.प्रभु गोरे यांचा सन्मान🌟

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील अल्पकालावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठलेले निर्भिड निष्पक्ष वृत्तपत्र दैनिक आधुनिक केसरीचे निर्भिड संपादक डॉ.प्रभू गोरे यांना पुणे येथील विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार जाहीर झाला आहे विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार विश्वबंधुता साहित्य परिषद,रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने १२ एप्रिल २०२५ रोजी एस.एम.जोशी सभागृह,नवी पेठ, पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वबंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाचे हे २७ वे वर्ष आहे.संमेलनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कारासाठी दैनिक आधुनिक केसरीचे संपादक डॉ.प्रभु गोरे यांची निवड करण्यात यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय संविधान आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. प्रभू गोरे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी नीळकंठ खाडिलकर यांच्या अग्रलेखांवर पीएच. डी. केली असून सध्या ते दै. आधुनिक केसरीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेतील भरिव कार्यासाठी त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना उजेडात आणण्यासाठी पत्रकारिता करणारे डॉ.प्रभू गोरे यांना मूकनायक पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या