🌟राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून गूरु रविदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन🌟
फुलचंद भगत
मंगरूळपीर :- दिनांक १९ फेब्रुवारी रोज बुधवारला मंगरुळपीर शहरातील बाबरे ले आऊट श्रीराम नगर मंगरुळपीर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे तुकाराम नाचने तर प्रमुख अतिथी म्हणून समाधान माने (उपाध्यक्ष रा.च.म. महाराष्ट्र राज्य) सुनिताताई अजय खिराडे ( सरपंच ग्रामपंचायत जांब, शहापूर,सोनखास) राहुल तुपसांडे (युवा उपाध्यक्ष रा.च.म. महाराष्ट्र राज्य) राजगुरु जिल्हाउपाध्यक्ष,अनुश इंगळे उपाध्यक्ष युवा आघाडी, सुत्र संचालन वैष्णवी महादेव इंगळे प्रास्ताविक चंद्रकांत नारायणराव इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. केतकी चंद्रकांत इंगळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले व सर्व समाजबांधव महीला, तसेच इंझोंरी, तहाळा, साखरडोह, कोंडोली, कासोळा, येथील समाजबांधव पत्रकार मंडळी, व ईतर आमंत्रित मंडळींनी कार्यक्रमांची शोभा वाढवली.....
0 टिप्पण्या