🌟डॉ.किशन लखमावार यांनी व्यंकटेश नेत्रालयासह शासकीय सेवेतून हजारो नेत्र रुग्णांची सेवा करून अंधत्व निर्मूलन केले🌟
हिंगोली : विश्व विख्यात संगणकीय अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने प्रथमच नेत्ररोग व नेत्र शल्यचिकित्सा सुविधा देणार व्यंकटेश नेत्त्रालय अंतर्गत फॅको अँड रेटिना केअर सेंटर हिंगोली हे मराठवाड्यात नेत्ररुग्ण सेवेत अग्रेसर करेन अशी ग्वाही उच्चविज्ञा विभूषित डॉ.प्रतीक किशन लखमावार ह्यांनी काढले.अलीकडेच त्यांनी हिंगोली परभणी जिल्ह्यात प्रथमच अत्याधूनिक नेत्रशल्य व नेत्ररोग चिकित्सा साठी सदरील नवोपक्रम सुरू केल्या बद्दल राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्कारार्थी डॉ.विजय निलावार ह्यांनी त्यांचे व ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ.किशन लखमावार ह्यांचा सत्कार केला तेंव्हा ते बोलत होते.दोन दशका पूर्वी पासून डॉ.किशन लखमावार ह्यांनी व्यंकटेश नेत्रालयतून व शासकीय सेवेतून हजारो नेत्र रुग्णांची सेवा करून अंधत्व निर्मूलन करून आदर्श घडवला आहे त्यामुळे त्यांचा ही सत्कार केल्याचे डॉ.विजय निलावार म्हणाले.
भविष्यात ही लखमावार परिवारातील सर्व तज्ञ व सुपर स्पेशालिस्ट डॉ.मंडळींच्या माध्यमातून रुग्ण सेवा कार्य निरंतर सुरू ठेवून प्रतीक फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देखील तज्ञ सेवा देणार असल्याचं डॉ. किशन व डॉ.प्रतीक लखमावार ह्यांनी स्पष्ट केले या सेंटरमध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन, विना इंजेक्शन रेटीनाची ॲन्जीओग्राफी, डोळ्याचा मागच्या पडद्याचा फोटो, ॲडव्हॉन्स व्हिट्रीओ रेटीनल सर्जरिज, इंट्रा व्हीट्रीअल इंजेक्शन, मोतीबिंदू ऑपरेशन नंतर येणाऱ्या जाळीवर लेझर उपचार, काचबिंदूसाठी लेझरद्वारे उपचार, विनास्पर्श डोळ्याचे वजनमाप आदी सुविधांचा समावेश राहणार आहे.....
0 टिप्पण्या