🌟शहरातील पीपल्स कॉलेज येथे समतावादी विचारांचा जागर शिवराय ते भिमराय ही व्याख्यानमाला संपन्न🌟
नांदेड :- फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेड महा राज्य आयोजित कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीच्या निमित्ताने समतावादी विचारांचा जागर शिवराय ते भिमराय हा व्याख्यानाचा कार्यक्रम पीपल्स कॉलेज येथे संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समतावादी मूल्य प्रत्येकाच्या मनात व जनसामान्यात रुजवण्यासाठी विशेष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातला ओबीसी मराठावाद छत्रपती मुस्लिम विरोधक अशा बाबींचा पसरवणारा द्वेष डोळ्यासमोर ठेवून समतेचा जागर आणि समतावादी मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी शिवराय ते भिमराय सागर समतावादी विचारांचा हा कार्यक्रम घडवून आणला.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा डॉ अनंत दा राऊत सर यांनी आपले व्याख्यान दिले. समाज कल्याण नांदेड येथील बार्टी संचालिका आदरणीय सुजाता पोहरे मॅडम उपस्थित होत्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य संदीपजी होणारकर सर व पीपल्स महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी विद्यार्थी मित्र मैत्रिणी उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी नेते अतिश भाऊ ढगे यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय कुमार गायकवाड,प्रबुद्ध काळे,रोहित आढाव,रोहित सोनकांबळे,श्रीकांत चव्हाण, प्रतीक्षा कांबळे, प्रिया पाटील, अंजली सूर्यवंशी,अंकुश सावते मिथुन वाघमारे,गजानन पवार साई पाटील,बाळकृष्ण गोरे,यश घुले,प्रशिक ढगे,सोनू खंदारे,देवा पाटील,विकास गजभारे,दीपक गजभारे,निखिल महाबळे, शिवकुमार दर्शने, सुरज,सावते, आदित्य कांबळे आदींनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या