🌟परभणी येथील रयत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रयत महोत्सवाचे आयोजन....!


🌟 शिवजन्मोत्सवा निमित्त संस्थेच्या वतीने 01 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पूर्ण महिना रयत महोत्सवाचे आयोजन🌟 

परभणी :- रयतेचे मांगले हेच आमुचे ब्रीद घेऊन रयत बहुउद्देशी सेवाभावी  संस्थेची स्थापना करण्यात आली व स्थापनेपासून संस्थेच्या वतीने विधवा ,निराधार, परितक्त्या, घटस्फोटीत ,भूमिहीन ,शेतमजूर, शेतकरी ,कष्टकरी ,महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने एक फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पूर्ण महिना रयत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यात येत आहे या महोत्सवाच्या माध्यमातून गावागावात आर्थिक साक्षरतेचा प्रशिक्षण देऊन लोकांना आर्थिक साक्षर केलं जात आहे या माध्यमातून आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणूक ,विमा ,ग्राहक संरक्षण कायदा ,अटल पेन्शन योजना, व इतर शासकीय योजना विषयी प्रशिक्षण देऊन विविध शासकीय योजनेत लोकांना जोडण्याचे काम केले जात आहे याबरोबरच बेरोजगार युवक युवतींना रोजगार विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे तरी या उपक्रमाचा गरजू महिलांनी व युवकांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सो स्वाती गजानन सुरवसे यांच्याकडून केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या