🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.......!


🌟संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचे टोकाचं पाऊल, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवले🌟

💫राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा ;  स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे; राहुल सोलापूरकरांवर अभिनेता हेमंत ढोमेकडून आगपाखड 

💫संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचे टोकाचं पाऊल, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवले, 20 दिवसापूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षीच आत्महत्या ; आणि हो आमची नवरीबाई", शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली ; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर ; शिरीष महाराज मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्यांमध्ये सगळंच बोलले;  32 लाखाचं कर्ज डोक्यावर 

💫आमदार सुरेश धस म्हणजे आधुनिक भगीरथ, बीडच्या आष्टीतील विकासकामा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक, मंत्री पंकजा मुंडे,सुरेश धस, बजरंग बाप्पा,प्रकाश सोळंकेंसह दिग्गज एकाच मंचावर ; फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ ; मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणणाऱ्या सुरेश धसांनी मला शिवगामी म्हटलं होतं,पंकजा मुंडेंकडून आठवण, म्हणाल्या मेरा वचनही है मेरा शासन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर एकापेक्षा एक डायलॉगबाजी

💫मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया,डॉक्टरांकडून पुढील चार ते पाच दिवस विश्रांतीचा सल्ला ; वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली,याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड 

💫विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाच छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू, बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल ; एकाच वेळी पुणे, मुंबई, फलटणमधील निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड, सोनं-चांदीच्या वस्तू दिसताच अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती ; फलटणमध्ये भावांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस, म्हणाले, काळजी नसावी! 

💫शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; 'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील यांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'

💫दिशा सालियान प्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज ; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत 

💫पुणे,सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक ; जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई, दूषित पाणी आढळलेल्या 'त्या' आरओ प्लांटला महापालिकेने ठोकलं टाळं 

 💫लोकांनी उपचारांसाठी तुमच्या निधीची वाट पाहायची का ? नांदेड रुग्णालय मृत्यूतांडव प्रकरणी हायकोर्टाचा सरकारला सवाल 

💫2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी छत्रपती संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डर अरुण तुपे यांच्या चैतन्य या मुलांचा शोध  लागला, अपहरणकर्त्यांच्या कारचा जालना जिल्हात अपघात झाल्याने 7 वर्षांचा चिमुकला सुखरुप सापडला ,  3जणांना अटक 

💫दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान, अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद, 8 फेब्रुवारीला मतमोजणी ; अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचे आवाहन

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या