🌟पुर्णेतील पवार महाविद्यालयात शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते🌟
पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी २०२५) :- कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे हे सामाजिक दायित्व स्वीकारणारे समाजभिमुख कर्तबगार राजे होते असे प्रतिपादन डॉ.भारत चापके यांनी केले.ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की सामाजिक सलोखा कसा राखावा हे छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारातून शिकावे अठरापगड जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन समाजात बंधूभाव निर्माण करणारे , त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवून त्यांना युध्दात सहभागी करून घेणारे शिवराय खरे रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी राजे यांनी स्त्रियांचाही तेवढाच सन्मान केला. स्त्रियांच्या बाबतीत ही ते तेवढेच संवेदनशील होते . परस्त्रीचे संरक्षण करणे तिचा सन्मान राखणे हे राजांनी कृतीतून रयतेला शिकविले . सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात राजांनी रयतेला समतेची बंधूतेची वागणूक दिली.
शेतकरी कष्टकऱ्यांना मायेने जपणारा खऱ्या अर्थाने बहुजनांचा राजा म्हणूनच छ्त्रपती शिवरायांचा उल्लेख केला जातो हे आपण समजून घेतले पाहिजे आगऱ्याची सुटका, मुस्लिम स्त्रीचा सन्मान, वेगवेगळ्या गड किल्ल्यांचा इतिहास सांगत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी राजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आज महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याच्या आदर्शाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा .डॉ.सुरेखा भोसले या होत्या त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने कुळवाडी भूषण रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनीही छ्त्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या