🌟संपादक बालासाहेब फड यांची निवड झाल्याने तालुक्यातील पत्रकारितेला नवीन दिशा मिळण्याची होतेय अपेक्षा व्यक्त🌟
परभणी/पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी २०२५) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने तालुका पातळीवरील नवीन अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून परळी तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक बालासाहेब फड यांची निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे परळी तालुक्यातील पत्रकारितेला नवीन दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य समन्वयक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष बालाजी तोंडे व शेख रिझवान यांनी सदरील निवड जाहीर केली आहे.नवनियुक्त परळी तालुका अध्यक्ष बालासाहेब फड यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तालुका आणि शहर पातळीवर लवकरच नवीन सभासद नोंदणी करून सक्षम कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पत्रकारांच्या हितासाठी व संघटनाच्या बळकटीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” असे त्यांनी सांगीतले. बालासाहेब फड यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून उत्स्फूर्त स्वागत होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकारितेच्या प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.....
0 टिप्पण्या