🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका : तात्काळ ट्विट हटवण्याचे दिले आदेश🌟
महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह द्विट करणारा तिनपाट अभिनेता कमाल आर.खानने याला सडेतोड जवाब देऊन त्याच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्याने ट्विटर अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत.
विक्षिप्त बुध्दीमत्तेचा अभिनेता चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके ह्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ट्विटर अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिताना केआरके या महामुर्खाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेदरम्यान याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
केआरकेनं विकिपीडियाचा आधार घेत ही पोस्ट लिहिली आहे. दरम्यान फडणवीसांनी संपर्क साधून वादग्रस्त कटेंन्ट काढून टाकण्याच्या सुचना दिल्या आहे. सायबर विभागाला फडणवीसांनी या सुचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाशी संपर्क करुन मजकूर काढून टाकण्याच्या सुचना केल्या आहेत. तसंच त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल. ती तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच असले लेखन खपवून घेतले जाणारा नाही अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.....
0 टिप्पण्या