🌟पोलीस आयुक्त डॉ.प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने केली कारवाई🌟
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रासह पंजाब राज्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब जनतेला वाटप होणाऱ्या शासकीय तांदळाची मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासनाने उद्ध्वस्त केले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी जवळील करोडी येथील गोदामावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धाड टाकून हजारो टन तांदूळ जप्त करण्याची धाडसी कारवाई केली शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील तसेच बालकांच्या पोषण आहारातील तांदूळ रिपॉलिशिंग करून परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पोलीस आयुक्त डॉ.प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
करोडी येथील गोदामात काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य असल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाली होती. उपायुक्त बगाटे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने करोडी शिवारातील गट क्रमांक ११९ मध्ये असलेल्या श्री गजानन अॅग्रो सेल्स कार्पोरेशन या गोदामावर छापा टाकला. मंगेश जाधव या गोडाऊनचे मालक असून त्यांनी मुंबई येथील संजय अग्रवाल यांना हे गोडाऊन भाड्याने दिलेले आहे. अग्रवाल है या ठिकाणी श्री गजानन अॅग्रोच्या नावाखाली व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. गोडाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र शासन आणि पंजाब राज्यातील तांदूळ, डाळीचा साठा आणून, रिपॉलिश करून त्याची बाहेरील राज्यात आणि देशात विक्री होत होता.
या ठिकाणी महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे शिक्के असलेल्या गोण्यांमाध्ये हजारो टन तांदूळ आढळून आला. विशेष म्हणजे या ठिकाणी स्तनदा मातांसाठी असलेल्या पोषन आहाराच्या बॅगाही आढळून आल्या. त्यावर ठळकपणे महाराष्ट्र शासन असा लोगो आहे........
0 टिप्पण्या