🌟या दिवशीच्या कार्यक्रमात देवीचे वहन,यात्रा महोत्सव चित्तवेधक होते🌟
✍️ मोहन चौकेकर
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक ३० जानेवारीला सुरू झाला होता त्याचे दुसरे पर्व 31 जानेवारी शुक्रवारला सुद्धा अगदी जल्लोषात साजरे करण्यात आले. याही दिवशी मुलांचा आणि पालकांचा उत्साह अगदी जोमात होता.
या दिवशीच्या कार्यक्रमात देवीचे वहन, यात्रा महोत्सव चित्तवेधक होते. या प्रसंगी चिखली शहराचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले की तीन ते चार मिनिटाचे नृत्य बसवण्याकरिता पालक तसेच शिक्षक अतिशय मेहनत घेतात. विद्यार्थी वर्षभरापासून स्नेहसंमेलनाची वाट पाहत असतात व स्नेहसंमेलन अविस्मरणीय बनवतात. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. चिखली शहराचे तहसीलदार मा. संतोष काकडे यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी, विविध प्रकारच्या संधी, नेतृत्व गुण, धाडस इत्यादी गुणांचा विकास होतो. शाळेनी अजून उंच भरारी घ्यावी शाळेचा नावलौकिक सतत पसरावा व संस्थाचालकांकडून चिखली शहर व परिसराची सेवा सतत घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या शाळा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घेत असते.अशीच या शाळेची प्रगती उत्तरोत्तर घडावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मनोहर खडके सर यांनी चार भिंतीतील शिक्षणाव्यतिरिक्त सुप्तगुणांचा विकास करण्याकरिता शाळेतील प्रत्येक व्यक्ती प्राचार्यापासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण प्रयत्न करत असतात. असे सांगितले. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या पाल्याने सुयश प्राप्त करावं त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि शाळा तसा प्रयत्न करतच असते.शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम हा दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यात कोळी नृत्य, शेतकरी नृत्य ,बुद्ध जयंती ,पोळा ,संत गजानन महाराजांची दिंडीअसे विविध नृत्य सादरीकरण झाले. शाळेच्या दहावीच्या उत्कृष्ट निकालाबाबत कौतुक केले. यावेळी समृद्धी संदिप सोनोने वर्ग ५ (अलकनंदा) या विद्यार्थिनीने सतत ३ तास स्केटिंग करून जागतिक स्तरावर आपल्या नावाची नोंद केली .या यशाबद्दल पालकांसमवेत तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे अध्यक्ष मा.सतीशजी गुप्त,उपाध्यक्ष मा.मनोहरजी खडके, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चिखली शहराचे ठाणेदार मा. संग्रामजी पाटील , चिखली शहराचे तहसीलदार मा. संतोषजी काकडे त्याचप्रमाणे शाळेचे सचिव मा. डॉ. आशुतोषजी गुप्ता, सहसचिव मा. पुरुषोत्तमजी दिवटे, पालक संचालिका मा.सौ ज्योत्स्ना गुप्ता , शैक्षणिक संचालिका मा.डॉ.सौ पूजा गुप्ता, मा. राजू व्यवहारे, मा.सौ मंजुश्री कोठारी, मा. सौ माई भवर तसेच शाळेचे प्राचार्य मा. गौरव शेटे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या