🌟भारतीय उद्योगपती गौतम अदाणींची सामाजिक कामासाठी १० हजार कोटींची मदत...‌!

 


🌟या विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे गौतम अदाणी यांनी जाहीर केले होते🌟

मुंबई :- भारतीय उद्योगपती तथा अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांचे कनिष्ठ चिरंजीव जीत अदाणी यांचा विवाह दिवा शाह यांच्याशी शुक्रवार ०७ फेब्रुवारी २०२५ अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडला आपल्या मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे गौतम अदाणी यांनी महाकुंभमेळ्यातील भेटीदरम्यान जाहीर केले होते.


त्या शब्दाला जागून अदाणी यांनी या विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले. जीत गौतम अदाणी याच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल. गौतम अदाणी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. सेवा साधना है, सेवा प्रार्थना है और सेवा ही परमात्मा है, या गौतम अदाणींच्या तत्वानुसार या निधीतून कशा प्रकारे समाजसेवा करावी हे ठरवण्यात आले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होईल......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या