🌟वसईत गर्भवती मुलीची हत्या,आई आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल🌟
🔴उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत डॉ. नीलम गोऱ्हेंचा आरोप ; एक महिला म्हणून आदर, राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभलं करून घेतलं, मर्सिडीज आरोपांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले ही तर निलमताई गोऱ्हे यांची नमकहरामी
🔴साहित्य संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख, आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा, नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर, गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांची जबाबदारी घेणार का? संजय राऊतांचा आयोजकांना प्रश्न ; त्यांच्या वाढदिवसादिवशी खाणं-पिणं, मंडप, सर्व खर्च अन् साड्या आमच्याकडून घेत,नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
🔴 माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचे रक्षण म्हणजे भाजपचे हिंदुत्व का? निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय राहुल नार्वेकरांच्या हाती द्यावी; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ ; सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न
🔴संतोष देशमुखांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नाही, आमदार सुरेश धसांची मोठी घोषणा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी शिंदेंचा बाण आणि अजित पवारांचं घड्याळ निवडून दिलं, आमदार सुरेश धसांचे वक्तव्य
🔴धनंजय मुंडे माझे दैवत, वाल्मिक कराड माझे नेते म्हणणाऱ्या बाळाजी तांदळेला सोबत घेऊन पोलिसांकडून आरोपीचा तपास, अंजली दमानियांकडून बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
🔴आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार, शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण, दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय, जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचाही दावा
🔴कोल्हापूर आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार, कर्नाटक परिवहनच्या बससेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळीक
🔴वसईत गर्भवती मुलीची हत्या, आई आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल, मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त आईचं कृत्य ; सोलापुरातील मंद्रूप या गावातील बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
🔴कोणत्याही परिस्थितीत तामिळनाडूत राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणार नाही, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची स्पष्ट भूमिका, तर तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका, कमल हसन यांचा केंद्राला इशारा
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या