🌟श्री हजुर साहेब नांदेड येथील सर्वोच्च धार्मिक संस्था तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती देण्यात यावी....!


🌟माजी सदस्य मनप्रीतसिंघ कुंजीवाले यांची गुरुद्वारा प्रशासक डॉ.विजय सतबिर सिंघ यांच्याकडे मागणी🌟


श्री हजुर साहेब नांदेड (दि.२७ फेब्रुवारी २०२५) :- श्री हजुर साहेब नांदेड येथील सर्वोच्च धार्मिक संस्था तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डामध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नियमनांसूर पदोन्नती देण्यात यावी तसेच दोन वर्षांपासून डेली विजेस सेवा पूर्ण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थाई सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि रोजदार तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना डेली वेजस सेवेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी हजुरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सदस्य गुरुद्वारा बोर्ड स. मनप्रीत  सिंघ गोविंद सिंघ कुंजीवाले यांनी गुरुद्वारा प्रशासक स.विजय सतबीरसिंघ यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.

 पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की रोजंदारीवर तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्याची भविष्य निर्वाह निधी कटत नाही किंवा त्यांना दोन वर्षानंतर त्या सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट झाल्यानंतर  ग्रॅज्युटी व ईपीएफ च्या लाभ मिळेल. व ज्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती होल्ड वर ठेवलेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रमोशन पदोन्नती देऊन त्यांच्यासोबत न्याय करावे असे साकडे गुरुद्वारा बोर्ड प्रशासक विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे निवेदन देताना कुंजीवाले सोबत स.भागीदार सिंघ घडीसाज माजी सदस्य गुरुद्वारा बोर्ड व भाजपचे गुरुप्रीत सिंघ सोखी हे उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या