🌟महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवस : हिन्दुस्थानच्या भाग्योदयाचा दिवस..!


🌟राज्यभरात सर्वत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात होतोय साजरा🌟                       

‼️प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज,श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय‼️

 ✍️ मोहन चौकेकर

     १९ फेब्रुवारी १६३०. इतिहास घडविणारा सुवर्ण दिन. स्थळ.. किल्ला शिवनेरी. जुन्नर जि. पुणे. आजच्या दिवशी हिन्दुस्थानाचा भाग्योदय करणाऱ्या  शिवाजी महाराजांचा जन्म झाला. गडावर जल्लोश झाला. सनई चौघडे वाजू लागले. लोक एकमेकांना मिठाई वाटू लागले. अत्याचारग्रस्त भारतीयांचा आर्त टाहो अखेर शिवाई देवीने ऐकला. या किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरुन राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी बाळराजेंचे नामकरण केले शिवाजी.

        या दिवसाचे एवढे महत्त्व की हा दिवस संपुर्ण हिन्दुस्थानात , जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणीनी चैतन्य निर्माण करतो. आज सर्वत्र आनंदाने भगवे ध्वज डौलात फडकत आहेत. रस्ते रांगोळ्यांनी सजलेत. गावोगावीच नाही तर विदेशातही हारफुलांनी सजलेल्या शिवप्रतिमांसह आज शोभायात्रा संपन्न होणार. शिवकालीन शस्त्रासह मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके होणार. भक्तीभावाने छत्रपती शिवप्रभूंच्या प्रतिमांचे पूजन.. आरती होणार. माझे.. माझ्या देशाचे नाव कायमस्वरुपी अबाधीत ठेवण्याचा आनंद छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाड्यातून व्यक्त होत देशप्रेम जागृत करणार.

        छत्रपती शिवाजी महाराज. जगातील आदर्शांचेही आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच स्फुरण चढते. भारतीय संस्कृती.. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष रोमांचीत करतो शुन्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे नेमके काय, पराक्रम म्हणजे काय, रामराज्य म्हणजे काय याची उत्तरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार म्हणजे त्यांचा अतुलनीय पराक्रम.. जिद्द.. राजकारण.. धर्मप्रेम, देशप्रेम,  मुत्सदेगीरी.. लोकोपयोगी उपक्रम अशा अनेक गुणांचे स्मरण.. उजळणी शत्रू कितीही बलाढ्य.. शस्त्र अस्त्र संपन्न.. कपटी, अत्याचारी असो.. परिस्थीती कितीही बिकट उदभवो पण  बुद्धीबळाने त्यावर मात कशी करावी हे सांगणारा शिवजयंतीचा उत्सव.

        कुतुबशाही.. आदिलशाही, निजामशाही इ. परकीय बलाढ्य शस्त्रसंपन्न शत्रूने देशभरात पाशवी अत्याचाराचा कळस गाठला होता. सनातन हिंदू धर्मावर आक्रमण केले होते. धर्मस्थळांचा विध्वंस सुरु होता. संपूर्ण देश भयभीत होता. पण पाशवी अत्याचाराविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य कुणात नव्हते पण..पण तो आजचा सोनेरी दिवस उगवला. किल्ले शिवनेरीवरचे सनई चौघड्याचे सुर मराठी मातीला निडरपणे जगण्यासाठी आश्वस्थ करत होते. राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी रामराज्य आणणाऱ्या या युगपुरुषाला जन्म दिला. कित्येक वर्षें पारतंत्र्यात खिचपत पडलेले हे भारतवर्ष आनंदले. शिवनेरीवर इतिहासाची मुहुर्तवेढ रचली जात होती, यामुळे संपुर्ण देश हर्षोल्हासीत झाला.

        राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी बाळराजे शिवाजी महाराजांना देशाची भीषण अवस्था समजावली. बालवयात प्रभू श्रीराम.. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे संस्कार केले. शस्त्रविद्या शिक्षणाची व्यवस्था केली.. राजकारण समजावले. देशहितासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न सांगितले.छत्रपतींनी या स्वप्नपूर्तीसाठी वेळोवेळी संकटांचा निडरपणे सामना केला. धैर्याने संकटाना सामोरे गेले. राजमाता जिजाऊमाॅसाहेबांच्या समोरच इतिहास घडला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असामान्य कर्तुत्वशाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाचा.. आदर्श राजकारणाचा.. समाजकारणाचा.. लोकहितकारी राज्यकारभाराचा जगभरात अभ्यास होत राहतो. त्यापासून प्रेरणा घेतली जाते. 

        छत्रपती शिवाजी महाराज हे भारतभूमीचे दैवत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेचे संरक्षण.. न्याय देण्यासाठी खर्च केला. रामराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज श्रीमंत योगी राजे ठरले भारतीय संस्कृतीला अपेक्षित सर्वांना न्याय देणारे सुराज्य आणणारे , जाणते राजे , प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, कुळवाडी भूषण,सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक ,रयतेचे राजे श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत , ज्ञानवंत ,कुलवंत, नीतिवंत, धनवंत, यशवंत ,सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज ,  जागतिक कीर्तीचे अद्वितीय राजे छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा  सर्वांना  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....

 शुभेच्छुक :-

पत्रकार मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद बुलढाणा 

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जय भवानी।  

जय शिवाजी हर हर महादेव*.                                                              

 ✍️ मोहन चौकेकर

🚩 जय भवानी, जय शिवाजी जय जिजाऊ 🚩

    *छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवस - १९.०२.२०२५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या