🌟बांगलादेशी रोहिंग्याची मराठवाड्यातही घुसखोरी प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत ?


🌟परभणी/लातूर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी रोहींग्या बनले मुळनिवासी🌟 

मुंबई : बांगलादेशी रोहिंग्याची मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याचे निदर्शनास येत असून स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणांसह ऑनलाईन सेवा केंद्रांतील लालची दलालांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी रोहींग्या मुळनिवासी बनून बस्तान मांडून बसल्याचा गंभीर देशघातकी प्रकार मराठवाड्यातील लातूर/परभणी जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे लातूरमध्ये बनावट पद्धतीने जवळपास ३,०५६ बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे तर परभणी जिल्ह्यात २,९०० बांगलादेशी रोहींग्या घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र/आधारकार्डसह राशन कार्ड देखील देण्यात आली आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.


 प्रथमतः किरीट सोमय्या यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी परभणी येथील पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी येत्या ४८ तासांमध्ये या घुसखोरांवर गुन्हें दाखल होणार असल्याचे सांगितले यानंतर त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाने याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात १.२३ लाखांहून अधिक बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत. लातूरमध्ये ३,४२१ व्यक्तींनी तहसील कार्यालयात आधार कार्ड सादर करून प्रमाणपत्रे मागितली. पैकी ३,०५६ जणांना जन्म प्रमाणपत्रे मिळाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या