🌟महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी : पाकिस्तानी फोनवरुन वरळी पोलीसांना मेसेज....!


🌟पाकिस्तानी मोबाईल नंबरवरुन वरळी पोलीस व वाहतूक शाखेला करण्यात आला कॉल🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांच्या कार्यालयावर हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी देणारा एक व्हॉट्सॲप मेसेज वरळी पोलीसांना मिळाला आहे. यावरुन पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज एका पाकिस्तानी मोबाईल नंबरवरुन वरळी पोलीस व वाहतूक शाखेला करण्यात आला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अगोदरच जीवे मारण्याची धमकी फोन द्वारे देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हॉट्सऍप मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. मुंबईतील वरळी पोलिसांनी हा मेसेज मिळाल्यावर लगेचच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हा मेसेज पाठवणाऱ्याचे नाव मलिक शाहबाज हुमायूं राजा देव असे सांगितले जात आहे. हा मेसेज पाठवणारा व्यक्ती भारतात आहे की भारताच्या बाहेर आहे, याचा शोध घेतला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानी नंबरवरून आलेल्या या मेसेजची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या एकत्रित चौकशीस करीत आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मेल गोरेगाव आणि जे.जे. मार्ग पोलीस स्टेशनसह अनेक सरकारी कार्यालयांना पाठवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या मेल प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३५१ (४), आयटी ऍक्ट आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. २६/११ चा दहशतवादी हल्ला कोणताही मुंबईकर कधीच विसरू शकत नाही. अशाच प्रकारचा हल्ला २० ऑगस्ट २०२२ रोजी करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला होता. तेव्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या