🌟पुर्णेतील महाराष्ट्र बँकेच्या 'कच्छवागती' कारभाराला अखेर बारा महिन्यांच्या कालावधी नंतर आली गती....!


🌟अन् बंद पडलेल्या एटीएम सुविधा केंद्राच्या नवीन फर्निचर निर्माण कार्याला अंशतः प्रगती🌟 

पुर्णा (दि.०३ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा शहरातील महावीर नगर परिसरात राष्ट्रीयकृत बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेतील बेजबाबदार शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांच्या कच्छवागती कारभार अजित न्युज हेडलाईन्स वेबवृत्त वाहिनीने प्रथमतः निदर्शनास आणून दिल्यानंतर शाखाधिकारी कच्छवे यांच्यासह महाराष्ट्र बँक प्रशासनाला खडबडून जाग आली आणि मागील जवळपास बारा महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या एटीएम सुविधा केंद्र चालू करण्याच्या दिशेने फर्निचरच्या कामाला वरिष्ठ अधिकारी शिंदे यांच्या आदेशाने सुरुवात करण्यात आली.


महाराष्ट्र बँक शाखेला लागुनच असलेल्या जागेसाठी जागामालक अग्रवाल यांच्याशी महाराष्ट्र बँक शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांनी महाराष्ट्र बँकेच्या नवीन एटीएम सुविधा केंद्राला जागा देण्यासंदर्भात सहा महिन्यांपासून भाडेकरार केला परंतु नवीन एटीएम सुविधा केंद्र निर्मितीच्या दिशेने कुठलेही पाऊल उचललेले गेले नाही त्यामुळे महाराष्ट्र बँकेतील असंख्य खातेदार/एटीएम धारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आम्ही अजित न्युज हेडलाईन्स वृत्तवाहीच्या माध्यमातून दि.०९ जानेवारी २०२५ रोजी 'पुर्णेतील महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी कच्छवेंचा 'कच्छवागती कारभार' मागील अकरा महिन्यांपासून एटीएम सुविधा बंद......एटीएम केंद्रासाठी मागील पाच महिन्यांपासून भाडेकरार ? भाडे देखील चालू अन् एटीएम धारक म्हणतात एटीएम कहा डालू ?' या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रकाशित केली यानंतर पुन्हा दि.१५ जानेवारी २०२५ रोजी 'पुर्णेतील महाराष्ट्र बँक शाखाधिकारी कच्छवेंच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक प्रकार उघडकीस...‌‌..महाराष्ट्र बँक प्रशासनाने तालुक्यातील वाई/लासीना गावांसाठी नियुक्त बँकींग करस्पॉंडींग एजंडचा नियमबाह्य बँकेतच ठिय्या' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्र बँक प्रशासनाने नवीन एटीएम सुविधा केंद्र निर्मितीच्या दिशेने पाऊल उचलल्याचे निदर्शनास येत असून एटीएम सुविधा केंद्राच्या फर्निचरच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आल्याने महाराष्ट्र बँकेच्या एटीएम अंतर्गत आपला आर्थिक व्यवहार चालवणाऱ्या असंख्य केंद्र व राज्य शासनाचे शासकीय पगार/पेन्शनधारक तसेच लहान मोठे व्यापारी,शासकीय गुत्तेदार यांना अपेक्षा काही अंशी उंचावल्याचे दिसत आहे दरम्यान महाराष्ट्र बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर असून सुरक्षा रक्षकाअभावी बँकेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ग्राहकांडील रक्कम पळवल्याच्या दोन घटना व पळवण्याचा प्रयत्न केल्याची एक घटना अशा एकंदर तीन घटना घडल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र बँक प्रशासनाने बँकेत तात्काळ सुरक्षा रक्षकांची देखील नियुक्ती करावी तसेच शाखाधिकारी कच्छवे यांनी काही फुटफाटवर/अतिक्रमण केलेल्या जागांवर तात्पुरते व्यवसाय करणाऱ्यांना देखील लाखों रुपयांच्या कर्जांचे वाटप केले असून त्यांना कोणत्या आधारे कर्जाचे वाटप करण्यात आले याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आता जनसामान्यांतून होत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या