🌟राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कारवाईचा निर्णय फडणवीस घेतील....!


🌟असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले🌟

पुणे : महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत अंजली दमानिया यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत मला जी माहिती दिली तीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली आहे याबाबत माझी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हीच याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली आहे असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कारवाईबाबत अजित पवारच निर्णय घेतील असे सांगून फडणवीस यांनी कारवाईचा चेंडू पवार यांच्या कोर्टात टाकला होता. पवार यांनी आता हाच चेंडू फडणवीस यांच्या कोर्टात टोलविला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या