🌟सिख समाज व बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेचा वतीने दि.१४ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार धरणे आंदोलन🌟
नांदेड (दि.११ फेब्रुवारी २०२५) - नांदेड गुरुद्वारा बोर्डामध्ये सिनीअर कर्मचाऱ्यांना डावळुन नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असंतोषासह नाराजीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नाचिन्ह निर्माण झालेला असून त्यामुळे गुरुद्वारा बोर्डामध्ये अनेक वर्षांपासुन इमाने इतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबलाचे खच्चीकरण झालेले आहे प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत भ्रष्टाचारी व नियमाचे उलंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे यामुळे समाजामध्ये नाराजी पसरली आहे.
या गैर कृत्याचा विरोध करण्यासाठी स्थानीक सिख समाज एकवटला असुन दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरुद्वारा गेट नंबर ०१ समोर स्थानिक सिख समाज व बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेचा वतीने धरणे आन्दोलन करण्यात येईल असे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी केले निवेदनावर बिरेंद्रसिंघ बेदी,भोला सिंग गाडीवाले प्रितपालसिंघ शाहू,बक्षीसिंघ पुजारी,दिपक सिंघ गल्लीवाले,जसपालसिंघ लांगरी,जसपालसिंघ लाखवाले, अमोलकसिंघ गल्लीवाले, जगजीतसिंघ खालसा,जसबीरसिंघ हुंदल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या