🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला : विधानसभा निवडणुकीसाठी ०५ फेब्रुवारीला मतदान....!


🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ०८ फेब्रुवारीला लागणार🌟

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर काल सोमवार दि.०३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता संपला विधानसभा निवडणुकीसाठी मतदार ०५ फेब्रुवारी रोजी होणार असून ८ फेब्रुवारी २०२५ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल सोमवारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला दरम्यान निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुक निकाला संदर्भात दि.०५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलला संपूर्णतः बंदी घातली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या