🌟लोकपालांनी न्यायाधीश यांच्या विरोधात सुनावलेल्या 'त्या' आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती....!


🌟लोकपालने ज्या न्यायाधीशांविरुद्ध तक्रार ऐकली त्यांचे नाव उघड करण्यासही खंडपीठाने केली मनाई🌟


नवी दिल्ली : लोकपालांनी उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांविरोधात विद्यमान तक्रारीची सुनावणी करणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे असे स्पष्ट करत लोकपाल यांच्या आदेशाला काल गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देखील नोटीस बजावली आहे. इतकेच नव्हे लोकपालन यांनी ज्या न्यायाधीशांविरोधात तक्रार ऐकली त्यांचे नाव उघड करण्यासही खंडपीठाने मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे नाव गुप्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाविरुद्धच्या तक्रारीची लोकपालांनी सुनावणी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालाच्या भारताच्या अधिकारक्षेत्रात येतात की नाही या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत आणि न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारीची सुनावणी लोकपाल करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ही एक अत्यंत त्रासदायक बाब असल्याचे म्हटले आहे.

💫उच्च न्यायालयाने न्यायाधीशाविरुद्धच्या तक्रारीची लोकपालांकडून सुनावणी :-

लोकपाल कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात येतात, असे २७ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील लोकपालने आपल्या आदेशात म्हटले होते. एका खासगी कंपनीशी संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि दुसऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लोकपालने देशाच्या सरन्यायाधीशांकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत गुरुवारी लोकपालच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या