🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेताताई महालेंना पत्रातुन जीवे मारण्याची धमकी....!


🌟पत्रातुन आम्ही बकरे कापणारे शीर शरीरापासून वेगळे करण्याची भाषा🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा/चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील  चिखली मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आमदार श्वेताताई महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळाले आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी धमकीच पत्र पाठवण्यात आलं होतं. शुक्रवारी दुपारी आमदार श्वेता महाले यांनी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आलेल्या पत्रामध्ये आमदार श्वेताताई महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह अशी उर्मट व जहाल भाषा वापरण्यात आली आहे. नेमकी किती पत्र आहेत आणि त्यामध्ये काय लिहलंय ते खुद्द आमदार श्वेताताई महाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे . मिळालेल्या पत्रामध्ये तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती, असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचे खुद्द आमदार श्वेता महालेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 

💫नेमक्या काय म्हणाल्यात आमदार श्वेताताई महाले ?

याप्रकरणी पत्रकारांना माहिती देताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या, काल माझ्या कार्यालयामध्ये  निनावी पत्र आले. एका लिफाफ्यामध्ये तीन धमक्या देणारी पत्र होती. त्या पत्रामध्ये जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. एका विशिष्ट समाजाचा उल्लेख देखील त्या पत्रामध्ये केला आहे आणि त्या समाजाकडून मला मारण्याची धमकी देण्यात आली होती. 'सिर तन से जुदा', अशा टाईपची लाईन तिन्ही पत्रामध्ये लिहिण्यात आलेली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्यासोबत असलेली सुरक्षा त्यांना वाचू शकली नाही, त्या तुलनेत तर आमदाराला काहीच सुरक्षा नसते. ती सुरक्षा जरी असली, तरीही जिवंत मारू. आम्ही बकरे कापणारे आहोत, शिर  शरीरापासून वेगळे करू अशा पद्धतीची ती तीन पत्र मला काल मिळालेली आहेत, अशी माहिती आमदार श्वेताताई महाले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या संदर्भात चिखली पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार देण्यात आलेली आहे, चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाणेदार संग्राम पाटील  पुढील तपास करत आहेत .  आमदार श्वेताताई महालेंना पत्रातुन जिवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीमुळे चिखली शहरातील  खामगाव चौफुलीवर संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. चिखली शहरात तणावपूर्ण शांतता आहे.....  

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या