🌟पुर्णा तालुक्यातील मौजे खांबेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामसेवक सडक योजनेतील डांबरीकरणाचे काम निकृष्ट....!


🌟मुख्यमंत्री ग्रामसेवक सडक योजनेच्या कामाची चौकशी करुन कामाचा दर्जा सुधारण्याची ग्रामस्थांची मागणी🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील मौजे खांबेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामसेवक सडक योजनेतील डांबरीकरणाचे काम अत्यंत दर्जाहीन व निकृष्ट होत असून सदरील मुख्यमंत्री ग्रामसेवक सडक योजनेच्या कामाची चौकशी करुन कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी मौजे खांबेगाव येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


तालुक्यातील मौजे खांबेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतर्गत होत असलेले डाबरीकरणाचे काम संबंधित गुत्तेदार अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन करीत असल्याने गावातील नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत या कामा संदर्भात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद परभणी यांना दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मौजे खांबेगाव येथील मुख्य रस्त्यांचे मुख्यमंत्री ग्रामसड़क योजनेंतर्गत डांबरीकरणाचे काम चालू आहे. सदरील काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन होत असून संबंधित कामाचे गुत्तेदार डांबर थराची जाडी अत्यंत कमी टाकत असून त्याचा दर्जा खूप निकृष्ट असल्याचे आढळून येत आहे गावातील नागरिकांनी कामावर प्रत्यक्ष भेट दिली असता वरील काम चांगल्या प्रकारे होत नसल्याचे दिसून आले आहे. सदर कामावरील कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांना या निकृष्ट कामा संदर्भात भ्रमणध्वनी द्वारे माहिती देण्यात आली परंतु या निकृष्ट व दर्जाहीन कामाकडे त्यांचं देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दिसत आहे तरी कार्यकारी अभियंता यांनी सदरील कामाची चौकशी करुन संबंधीत कामाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर गजानन बापुराव कदम,नारायण दराजी खंदारे,विश्वांभर मारोती भोसले,नरहरी सोपान चिमुळे,रमेश रामराव,अविकाश काशिनाथ चौके,गोपाळ मुंजाजी पावडे,संदीप रंगनाथ पावडे,शेख युनुस गफुर,गणेश जनार्धन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या