🌟पुर्व पत्नी करुणा मुंडे यांना दोन लाख पोटगी देण्याचे न्यायालयाने दिले आदेश🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने जबर धक्का दिला आहे. पहिली पत्नी करुणा मुंडे यांना प्रतिमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कौटुंबीय न्यायालयाने दिले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड सोबत असलेल्या कथीत संबंधामुळे सतत राजीनाम्याची मागणी होत असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिसांचार प्रकरणी वांद्रे कौटुंबिय न्यायालयात प्रतिमहा पंधरा लाख पोटगी मिळविण्यासाठी दावा दाखल केला होता.
या प्रकरणी न्यायालयाने करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पोटगी वाढवून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी या निर्णयानंतर दिली आहे. याविषयी बोलतांना करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेला जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, न्यायालयाने आता मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे असे त्यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या