🌟काश पटेल हे अमेरिकन वकील आणि माजी फेडरल अभियोक्ते आहेत🌟
न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या काश पटेल यांची 'एफबीआय' अर्थात अमेरिकेच्या 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्ह स्टिगेशन' च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असलेल्या काश पटेल यांचा ५१-४९ मतांनी निसटता विजय झाला. काश पटेल यांच्या नियुक्तीला गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सिनेटने मंजुरी दिली.
काश पटेल (४४) हे अमेरिकन वकील आणि माजी फेडरल अभियोक्ते आहेत. ते एफबीआयचे नेतृत्व करणारे पहिले हिंदू आणि भारतीय अमेरिकन वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. पटेल कुटुंबाचा प्रवास १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला झाला. वांशिक भेदभावामुळे ते युगांडा सोडून कॅनडामध्ये स्थायिक झाले. काश यांच्या वडिलांनी एका विमान कंपनीच्या आर्थिक विभागात अधिकारी म्हणून पद स्वीकारल्यानंतर ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. काश पटेल यांची व्यावसायिक कामगिरी सर्वश्रुत असली तरी विशेषतः रशियाबद्दलची त्यांची ठाम भूमिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत असलेली निष्ठा गोपनीय ठेवली गेली.....
0 टिप्पण्या