🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू,देशातील पहिलेच राज्य,सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार🌟

💫पैलवान शिवराज राक्षेने लाथ घालून चूक केली,अशा पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे,महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य ; महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू काका पवारांचा गंभीर आरोप,महाराष्ट्र केसरीच्या फायनलमधल्या पंचांना जन्मठेपेची शिक्षा देणार का ? काका पवारांकडून सवाल उपस्थित शिवराज राक्षे पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटी देऊ ; प्रशिक्षक रणधीर पोंगल यांचे थेट आव्हान 

💫महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराज राक्षेचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा,शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप ; शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांनी पंचांच्या विरोधात तक्रार दिली तर पंचांवर देखील कारवाई करणार,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पष्टीकरण 

💫मंत्री धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली, मनोज जरांगेंनी सांगितला निवडणुकीपूर्वी झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा ; संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला मंत्री धनंजय मुंडेंनीच लपवून ठेवल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेला अल्टिमेटम संपला, मंत्री धनंजय मुंडे विषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार अंजली दमानियांचा इशारा 

💫 भाजप नेत्यांनाही बीडचं वावडं, चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवारांचे वक्तव्य, विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची सारवासारव 

💫शिवसेना जोडायची वेळ आली म्हणणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा यू टर्न, एवढा दुरावा आला आहे की उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणे अशक्य, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचे नवे वक्तव्य 

💫35 वर्षीय सीमा,29 वर्षीय राहुल,प्रेमप्रकरण,पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर ; दुहेरी हत्याकांडाने साईबाबांची शिर्डी हादरली, संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू, तर एक गंभीर एक संशयित ताब्यात 

💫शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 89 हजार कोटींची थकबाकी,राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा 

💫 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले,विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत  आरोप 

💫13 षटकार अन् 7 चौकार, टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मानं इंग्लंडविरोधात पाचव्या टी-20 सामन्यात 37 चेंडूत शतक ठोकलं 

💫अभिषेक शर्माचे एकाच सामन्यात 13 षटकार,सर्वाधिक षटकारांचा रोहित शर्माचा 8 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडला ;  उद्योगपती  मुकेश अंबानी उठून उभे राहिले, टाळ्यांचा कडकडाट करत राहिले, अभिषेक शर्माच्या वादळाला सगळ्यांनी सलाम ठोकला 

💫कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य,सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या