🌟मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेचा उत्कर्ष करतील काय ? शहरवासीयांना पडला प्रश्न🌟
पुर्णा :- पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडतच चालल्याचं चित्र पाहावयास मिळत असून मुख्याधिकारी पदाचा पदभार उत्कर्ष गुट्टे यांनी स्विकारल्यानंतर नगर परिषदेतील प्रशासकीय कारभारासह शहरातील विकासात उत्कर्ष (सुधारणा) होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु उलट पुर्णा शहरवासीयांचा अपेक्षाभंगच झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांचे प्रशासकीय व्यवस्थेवर कसल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने शहरातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा शासकीय विकासनिधी आल्यानंतर देखील मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असून या अनियंत्रित कारभारामुळे शहरात चांगल्या प्रकारचे रस्ते स्वच्छ नाल्या,स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचा पाणीपुरवठा,रस्त्यांवरील पथदिवे (street light) शहरातील स्वच्छता आदी मुलभूत नागरी सुविधांसाठी तरसावे लागत असून शहरातील आनंद नगर,आदर्श कॉलनी,बोर्डीकर प्लॉटींग,अमृत नगरसह अनेक भागात नगर परिषदेची पाणीपुरवठा पाईप लाईन अद्यापही पोहोचलेलीच नाही तर अनेक भागात जवळपास तिन ते चार दशकांपूर्वी बसवण्यात आलेली व शहरातील नाल्यातून आलेली पाणीपुरवठा पाईप लाईन अक्षरशः जागोजागी फुटल्याने या फुटक्या पाईपलाईन मधून नाल्यांतील अस्वच्छ पाणी येत असल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव जंतुयुक्त पाण्याचा पिण्यासह इतर घरगुती कामांसाठी वापर करावा लागत आहे त्यामुळे अनेकवेळा पाणीपुरवठा योजनेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील नागरिक स्वच्छ व निर्जंतुक पाण्यासाठी नगर परिषदेत पायताण फाटोसतर चकरा मारतांना व अर्जावर अर्ज देतांना दिसत आहेत.
पुर्णा शहरातील काही भागातील नागरिक पाण्यासाठी अक्षरशः तळमळत आहेत काही भागांत नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे पाण्याचा अपव्यय होतांना मिळत असून शहरातील मुख्य व्यापार पेठेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर परिषदेच्या नळांचे पाणी काही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सोडत असल्याने सदरील पाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचत आहे त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी त्रास तर होतच आहे याशिवाय या रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांमुळे आसपासच्या दुकानांमध्ये खड्ड्यातील पाणी उडतांना पाहावयास मिळत आहे अनेक नळांना थुट्या बसवाव्यात आलेल्या नसल्याने संबंधित नागरिकांना नळांना थुट्या बसवण्याचे आदेश द्यावेत तसेच डॉ.आंबेडकर चौकात रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांवर देखील नगर परिषद प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे शहरातील आनंद नगर परिसरातील नळांच्या दुरुस्तीसाठी तर सिद्धार्थ नगर परिसरात पाणी पूरवठा कमी दाबाने येत असल्याने पाणी पुरवणा सुरळित करण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपात निवेदन देऊन पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली आहे शहरातील आनंद नगर चौकात रस्त्यावर पाईप लाईन फुटल्याने तात्काळ फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करण्याची मागणी अनेक वेळा निवेदने देऊन परिसरातील नागरिकांनी केली तरी देखील फुटकी पाईप लाईन दुरुस्त केल्या जात नाही त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या भागातील रस्त्यावर काही लोकांनी नळाचे कनेक्शनसाठी खोदकाम करून खड्डे तसेच ठेवले आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे एखादी मोठी अपघाताची घटना देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात आनंद नगर भागातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाव्दारे गणेश कऱ्हाळे,रुपेश बालाजी कोत्तावार,बालाजी कोत्तावार सुनिल अग्रवाल,किशन डुब्बे,अनंत बारटक्के राजाभाऊ पारवे,गजानन कऱ्हाळे,नवनाथ जोगदंड,भगवान दास मुंदडा,अदित्य अग्रवाल,सुनिल हानेगावकर,रतन साखरे,गजानन जोशी,महेश जोशी,गंगाधर नागठाणे,नागनाथ भालेराव आदींच्या स्वाक्षाऱ्या आहेत तर सिद्धार्थ नगर परिसरात कमी दाबाचा पाणी पुरवठा होत असल्याने व नागरिकांना वेळेवर सुरळीत व मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकाचे पाण्याअभावी त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा पाईप लाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळित करावा अशी मागणी सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिकांनी निवेदनाव्दारे मुखाधिकारी केली असून या निवेदनावर विजय वाघ,आकाश जोगदंड ,धम्मा पंडित,धनराज नलावडे,विजय बगाटे,किशोर गायकवाड,सुनिल जोगदंड,पवन घंटे,विश्वनाथ दुहीले,किरण गायकवाड,किशोर दुयेते,गणेश मुळेकर,निलाबाई वाघमारे,छायाबाई गायकवाड,कुणाल येसुरकर,संतोष जाधव ,वंचाळबाई दुयेले,भाग्यश्री गायकवाड,विकास जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......
0 टिप्पण्या