🌟परभणी शहरातील सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा.....!


🌟भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना साकडे🌟 

परभणी (दि.०१ फेब्रुवारी २०२५) : परभणी महानगरपालिका हद्दीतील सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

             संपूर्ण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वाहनांचे प्रमाणदेखील वाढत आहे. परंतु, वाहतूकीच्या या ताणामुळे चौकांसह प्रमुख रस्ते अक्षरशः गजबजले आहेत. त्यातच शहराच्या मध्य वस्तीतूनच जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून या जड वाहनांमुळे व वाहतूकीच्या ताणामुळे दररोज छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. वाहनधारकही दररोजच्या कोलमडलेल्या वाहतूकीमुळे अक्षरशः हैराण आहेत. त्यामुळेच आपण जिल्हा प्रशासनास तातडीने शहरांतर्गत चौकातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्या संदर्भात आदेश द्यावेत, अशी अपेक्षा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी व अ‍ॅड. हनमंत सोमवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या