🌟गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी व पंजप्यारे साहिबान यांच्या हस्तें होणार उद्घाटन🌟
नांदेड (दि.०१ मार्च २०२५) : नांदेड शहरापासून जवळच असलेल्या ढाकनी गावात बांधण्यात आलेल्या 'चरण कवल साहिब' गुरुद्वाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणी पंजप्यारे साहिबान यांच्या हस्ते रविवारी पार पडणार आहे. तसेच संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा तेजासिंघजी आणी इतर धार्मिक व्यक्तींची यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे.
शीख परंपरेनुसार सकाळी ११.३० वाजता दरम्यान धार्मिक रीतिया हे उद्घाटन संपन्न होईल. धाकनी गावात मागील अनेक दशकापासून शीख समाजाचे वास्तव्य आहे. तसेच मागील चार पिढियापासून येथे गुरुद्वारा असून शीख परंपरेची अनुपालना होत आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने येथे जुन्या गुरुद्वारा ठिकाणी नवीन व भव्य गुरुद्वाराचे निर्माण केले आहे. वरील गुरुद्वाराच्या इमारतीचे उद्धघाटन येथे होणार असून नांदेड परिसरातून हजारों भाविक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. वरील कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती ढाकनी येथील शीख संगतच्या वतीने करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या