🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दहावी/बारावी परीक्षांबाबत केला मोठा निर्णय जाहीर....!


🌟सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या परिक्षा केंद्रांवर उघडकीस येतील त्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी होणार रद्द🌟

मुंबई : राज्यात दहावीसह बारावीच्या परीक्षेला काल मंगळवार दि.११ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली असून राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या परीक्षांबाबत मोठा निर्णय जाहीर केला असून इयत्ता दहावी,बारावी परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या परिक्षा केंद्रांवर उघडकीस येतील त्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना देखील बडतर्फ करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते.

इयत्ता बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत राज्याच्या ३,३७३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रांवर होणार आहे.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३'ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटःस, मोबाइल इ.) जवळ बाळगणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठ्या पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा कराव्यात..‌..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या