🌟शिवकीर्तनासाठी हजारो संख्येने उपस्थित रहावे : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव जयंती समितीचे आवाहन🌟
बुलढाणा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व मराठी मनाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा, बुलढाणा येत्या शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी आपल्या विनोदी शैलीने प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या जाहीर शिवकीर्तनाने आरंभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने बुलढाणा शहरात प्रथमच महाराष्ट्रातील गाजलेले विनोदी कीर्तनकार हभप.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर शिवकीर्तन शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत "शिवनेरी" जिजामाता प्रेक्षागार परिसर, आयडीबीआय बँक चौक बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिवकीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, हे विनम्र शिव आवाहन "आम्ही शिवप्रेमी" समस्त बुलढाणेकर व आयोजक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या