🌟महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन परभणी रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यास आले प्रवासी महासंघाने दिले निवेदन🌟
परभणी (दि.०४ फेब्रुवारी २०२५) :- परभणी रेलवे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांना परभणी स्थानकासह मराठवाड्यातील जनतेला विविध रेलवे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेलवे प्रवासी महासंघाने केली आहे. नांदेड विभागातील विविध स्थानकाची पाहणी करण्यासाठी दमरेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन,नांदेड विभागाच्या व्यवस्थापक नीती सरकार आदी दौऱ्यावर होते आज बुधवार दि.०४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०४.३० वाजेच्या सुमारास परभणी स्थानकावर लवाजम्यासह दाखल झाले.
यावेळी प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज,प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन,बाळासाहेब देशमुख,माणिक शिंदे,कदिर लाला हाश्मी,आकाश लंगोटे सह आदीने महाव्यवस्थापकाची भेट घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली त्यात परभणी -औरंगाबाद दुहेरीकरण मान्यता मिळणे,कोविड पूर्व नांदेड -औरंगाबाद गाडी क्रमांक (7065 / 7066 ) पुन्हा सुरू करणे,परभणी जक्शन येथे 21 डब्यांची पिट लाईन उभारणे,रायचूर- परभणी (गाडी क्रमांक 17663 )चा विस्तार जालना पर्यंत करणे,जालना -छापराचा विस्तार पूर्णा पर्यत करणे रॉयलसीमा एक्सप्रेस ( गाडी क्रमांक 12794 ) नांदेड पर्यंत करणे,पंढरपूर ते शेगाव तीर्थक्षेत्र गाडी सुरू करणे,नांदेड -पुणे सकाळच्या वेळी नवीन गाडी सुरू करणे,परभणी स्थानकाचे बांधकाम काम जलदगतीने पूर्ण करणे,परभणी स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र 4 व 5 उभारणे ,नवीन पादचारी पुलाला बाहेरचा रस्ता मोकळा करणे आदीचा समावेश होता.......
0 टिप्पण्या