🌟आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन ८ आमदारांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश....!

 


🌟पक्षाचे तिकीट नाकारण्याच्या निर्णयावर हे सर्व आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे🌟

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुक शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असतांनाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसला असून आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या ८ आमदारांनी दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.


दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपला मोठी ताकद मिळाली आहे.वंदना गौर (पालम), रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी),गिरीश सोनी (मादीपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), राजेश ऋषी (उत्तम नगर), बीएस जून (बिजवासन), नरेश यादव (मेहरौली) आणि पवन शर्मा (आदर्श नगर) हे आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाला रामराम ठोकणाऱ्या आठपैकी सात आमदारांना विधानसभा निवडणुकीत आपने तिकीट नाकारले होते. त्यामुळे पक्षाचे तिकीट नाकारण्याच्या निर्णयावर हे सर्व आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या